लॉजिकला गुंडाळून मॅजिकल भरारी घेणारा Fly Away Home! - Welcome to Swayam Talks
×

लॉजिकला गुंडाळून मॅजिकल भरारी घेणारा Fly Away Home!

नविन काळे

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण जगापेक्षा एक पाऊल पुढे राहाल याची आम्ही खात्री देतो.
 

Published : 17 November, 2023

लॉजिकला गुंडाळून मॅजिकल भरारी घेणारा Fly Away Home!

Get Better Each Week #23

काही लोकांचे संपूर्ण आयुष्य अतिशय 'लॉजिकल' जगण्यात जाते. 'लॉजिक' ही त्यांची पूर्वदिशा असते. शाळेत बेताचे मार्क मिळणाऱ्या मुलाने IAS होण्याची जिद्द बाळगू नये. सावळ्या मुलीने विश्वसुंदरी होण्याचे स्वप्न पाहू नये. पाय नसलेल्या माणसाने पर्वत-डोंगर का चढावा? मराठी मध्यमवर्गीय माणसाने करोडपती व्यावसायिक होण्यात आपला वेळ का घालवावा? कारण यात लॉजिक मिसिंग आहे ! मग त्याच्या वाटेलाच का जा ! पण काही माणसं त्या लॉजिकच्या पलीकडच्या प्रदेशात जातात. त्या प्रदेशाला मॅजिक म्हणतात. मॅजिकच्या प्रदेशात जाणारी माणसं इतिहास घडवतात. त्या इतिहासाच्या परीक्षेत लॉजिकने जगणारी माणसं पैकीच्या पैकी मार्क मिळवतात, हाच काय तो फरक !

पक्षी जन्माला आल्यावर काही गोष्टी त्यांना उपजत येत असतात तर काही गोष्टी ते शिकतात. स्थलांतर करण्याचे ज्ञान ते आपल्या आई वडिलांकडून शिकतात. ही लॉजिकल वाक्यं झाली. लॉजिक गावाला बायपास करून थेट मॅजिक गावात गेलेल्या विल्यम लिशमनची म्हणूनच गोष्ट होते ! आणि ती Fly Away Home या नितांत सुंदर सिनेमातून सांगितली जाते.

Cinema Poster

विल्यम लिशमनच्या आयुष्यातील एका विलक्षण सत्यघटनेवर आणि त्याच्याच पुस्तकावर Fly Away Home हा सिनेमा बेतला आहे. सिनेमकर्त्यांनी इथे फक्त त्या घटनेचा आधार घेतला आहे. सिनेमाची गोष्ट अधिक रंजक करण्यासाठी पात्रांची नावे, घटना याबाबतीत स्वातंत्र्य घेतले आहे.

सिनेमाच्या सुरुवातीलाच टॉमच्या विभक्त पत्नीचा अपघातात मृत्यू होतो. त्याच अपघातात वाचलेल्या Amy या तेरा वर्षाच्या मुलीला टॉम न्यूझीलंडमधून कॅनडामध्ये आपल्या घरी घेऊन येतो. एका प्रचंड मोठ्या विस्तीर्ण मोकळ्या माळरानावर टॉम राहतोय. फॅब्रिकेशनची कामं करून तो चरितार्थ चालवत असला तरी 'फ्लाईंग' हे त्याचं पॅशन आहे. छोटी हलकी विमानं तयार करून आकाशात उडत राहायचं त्याला वेड आहे.
अनेक वर्षे बापापासून दूर राहिलेल्या Amy ला सुरुवातीला बापाचा हा स्वच्छंदी स्वभाव पचवणं जरा जडच जातं. त्यात टॉमची गर्लफ्रेंड सुझान तिथे राहत असल्यामुळे बापाबद्दल तिच्या मनात किंचितशी अढीच आहे.

एकदा लाकडांसाठी जंगल कापणी होते. त्यात बरीच झाडे कापली जातात. तेव्हा Amy ला आई पासून विभक्त झालेली गुझ (Goose) ची १६ अंडी मिळतात. गुझ म्हणजे थोड्या मोठ्या बदकांची जात. Amy ती अंडी घेऊन घरी येते आणि त्यांना घरीच उबवते. अंड्यातून पिल्लं बाहेर येतात आणि सर्वात आधी Amy ला पाहतात. ही पिल्लं जन्माला येऊन सर्वात आधी ज्या सजीवाला पाहतात त्यालाच आपली आई मानतात (हा खुलासा पुढे सिनेमात येतो). आता amy जाईल तिथे ही पिल्लं तिला follow करू लागतात. टॉमला मात्र वेगळीच चिंता असते. कॅनडाची थंडी सहन न झाल्यामुळे गुझ पक्षी प्रत्येक थंडीत दक्षिणेकडे स्थलांतर करतात.हे पक्षी स्थलांतर करणं आपल्या आई वडिलांकडून शिकतात. जर या पिल्लांचे आई वडील जिवंत नसतील आणि सध्या ते Amy ला आपले पालक समजत असतील तर हे स्थलांतर कसे करतील? आणि यांनी स्थलांतर केलं नाही तर ते सर्व पक्षी मरून जातील. काय करावं? एक दिवस टॉमला एक भन्नाट आयडिया सुचते... amy ला flying शिकवायचं. Amy आकाशात विमान उडवेल आणि तिच्या पाठोपाठ हे सगळे पक्षी उडत येतील. Amy ने विमान उडवत पाचशे मैल टप्प्या टप्प्याने प्रवास करायचा आणि या पक्ष्यांना तिथे उडवत घेऊन जायचं ! सगळे जण टॉमला वेड्यात काढतात. 'प्रॅक्टिकल लॉजिकल' गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतात. पण टॉम जिद्दीला पेटून उठतो. अनेक अडचणी निराशा आणि संकटे पार करत टॉम, Amy आणि १६ पक्षी तो ऐतिहासिक प्रवास कसा करतात यासाठी तुम्हाला Fly Away Home सिनेमा प्रत्यक्ष पाहण्यात खरी गंमत आहे.

मुख्य पात्रांचा अभिनय, त्या सर्व पक्ष्यांच्या टिपलेल्या अप्रतिम भावमुद्रा, मनात कायमची रेंगाळत राहील अशी सिनेमॅटोग्राफी, दुबळे पाय असल्याने उडू न शकणारा igor, सिनेमाचं पार्श्वसंगीत... आणि last but not the least विल्यम लिशमनला सलाम म्हणून तुम्ही हा सिनेमा पाहायला हवा.

निसर्ग सर्व शक्तिमान असतो. त्याच्यापुढे माणूस म्हणजे किस झाड की पत्ती... वगैरे लॉजिकल वाक्यं आपण लहानपणासपासून ऐकत असतो. अनेक बाबतीत ते खरंही आहे. पण विल्यम लिशमनसारखी काही माणसं मात्र लॉजिकला न जुमानता निसर्गाला आव्हान देत नवी नवी उत्तरं शोधू पाहतात. म्हणूनच आजूबाजूच्या सर्व लॉजिकल गर्दीत आपल्यातील मॅजिक टिकवून ठेवण्यासाठी Fly Away Home सारखे सिनेमा पाहणे आवश्यक आहे.

हा सिनेमा प्राईम व्हिडिओवर फक्त रु.६९ भाडं भरून ४८ तासांसाठी पाहता येईल. शक्य झाल्यास हा सिनेमा मुलांबरोबर पाहा.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

पिप्लंत्री ग्रामदूत - पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल

'बेटी धनाची पेटी' हे आपण ऐकतो, वाचतो. पण हे प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलं आहे पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल यांनी! त्यांनी...

काळजी वाहणारे Robot युग!

Robots बद्दल गेले अनेक वर्ष आपल्याला कुतूहल आहे. मानवी गरजा समजून त्यावर supercomputing च्या साहाय्याने emotional support देणारा robot बनवता आला...

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...