ही दिवाळी अधिक 'productive' करूया का? - Welcome to Swayam Talks
×

ही दिवाळी अधिक ‘productive’ करूया का?

नविन काळे

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण जगापेक्षा एक पाऊल पुढे राहाल याची आम्ही खात्री देतो.
 

Published : 10 November, 2023

ही दिवाळी अधिक ‘productive’ करूया का?

Get Better Each Week #22

हा ब्लॉग वाचत असताना, I am sure, तुमच्या डोक्यात आत्ता दिवाळीचे प्लॅन्स नाचत असणार. 

दिवाळीच्या पहिल्या पहाटे काय करायचं? शॉपिंग काय काय करायचं? भाऊबीजेच्या गिफ्ट्स कोणाकोणाला, किती आणि काय द्यायच्यात? अजून फराळ राहिला असेल तर त्याची एक लिस्ट ? फराळ बाहेरून न आणता घरीच करण्याचा उत्साह अजून टिकून असेल तर त्या जिन्नसांची लिस्ट? दिवाळीच्या सुट्टीत फिरायला जाणार असाल तिथे काय काय घेऊन जायचं त्याची लिस्ट? घरची साफसफाई, उटणं, पणत्या, फटाके…. इ. इ. ची लिस्ट? याचवेळी मधूनच डोकावणारी ऑफिसमधली पेंडिंग कामं… ? एकाच वेळी डोक्यात अनेक गोष्टींचा गोंधळ ! डोक्यातून येणारे ते वेगवेगळे आवाज आणि  त्या सगळ्या आवाजांना भेदून जाणारा - ‘कसं होणारे सगळं?’ - हा एक मोठ्ठा आवाज ! 

सर्वात आधी एक समजून घ्या की या बोटीत तुम्ही एकटे नाहीयात. माझ्यासहित अनेक जण आपण एकाच बोटीतून प्रवास करतोय. आपण सगळे एकाचवेळी अनेक गोष्टी करत असल्यामुळे येणारं ते overwhelming feeling मी अगदीच समजू शकतो. पण त्यावर मी आज एक सोप्पा उपाय सांगणार आहे. तो उपाय आहे, डोक्यात साठलेली ही सगळी कामं कुठेतरी लिहून काढायचा किंवा त्यांची नोंद करायचा. मी स्वतः कधी कधी कागद-पेन वापरणारा ‘old school’ असलो तरी अनेक गोष्टी organize करून ठेवण्यात कागदाला मर्यादा आहेत. म्हणूनच मी तुम्हाला एका Mobile App बद्दल सांगणारे जे मी स्वतः गेले वर्षभर वापरतोय ! 

या App चं नाव आहे - Todoist ! हे App Google Playstore आणि iOS च्या App Store वर उपलब्ध आहे. 

याचं एक free version आहे आणि एक premium (paid) version देखील आहे. पण माझ्या अनुभवानुसार आपल्यासाठी आत्ता free version सुद्धा पुरेसं आहे. 

हे App download झाल्यावर गुगल लॉगिन करून तुम्ही याचा वापर सुरु करू शकता.

हे App वापरायला अतिशय user friendly आहे. यामध्ये तुमच्या रोजच्या कामांची विभागणी वेगवेगळ्या बकेट्समध्ये करण्याची सोय आहे. त्याला म्हणतात projects !  उदा. मी माझ्या कामांची विभागणी मुख्यतः तीन projects मध्ये केली आहे  - Work, Personal आणि Learning. पण तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे ‘projects’ निर्माण करू शकता. 

यानंतर तुम्ही त्या प्रत्येक project मध्ये आता तुमची कामं लिहून ठेवू शकता आणि ती कधी करायची आहेत त्याची Due date (आणि वेळही) देऊ शकता. यामुळे तुमची कामं वेगवगळ्या दिवसांमध्ये विभागली जातात. याशिवाय तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक Task च्या खाली Sub Task निर्माण करण्याची देखील इथे सोय आहे. उदा. तुमचं काम आहे भाऊबीजेसाठी गिफ्ट्स आणणे. यामध्ये तुम्ही खालील प्रकारे त्या एका एका कामाच्या आत येणारी छोटी छोटी कामं देखील टाकू शकता. 

तुमच्या सर्व कामांची या App मध्ये व्यवस्थित नोंद केल्यावर तुम्हाला अमुक एका दिवसाची सर्व कामे वेगवेगळ्या projects नुसार दिसतात किंवा एका project मधील सर्व कामे तारखेनुसार दिसतात. हे या App चं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे आणि या बाबतीत हे App गुगल कॅलेंडरच्या एक पाऊल पुढे आहे. आणखी एक गंमत म्हणजे, तुम्ही हे App आणि गुगल कॅलेंडर sync करू शकता. यामुळे तुम्ही या App मध्ये केलेल्या entries तुम्हाला गुगल कॅलेंडरमध्ये देखील reflect होतात. 

सध्या कामाची productivity सुधारण्यासाठी जितकी Apps वापरली जातात, त्यात Todoist हे App सर्वात लोकप्रिय Apps पैकी एक आणि वापरण्यास अत्यंत सोप्पं असं App आहे. तुम्ही हे App डाउनलोड करून वापरायला लागलात की तुम्ही त्यात काही तासांत / दिवसांतच पारंगत व्हाल. याशिवाय YouTube वर हे App कसं वापरायचं याची अनेक tutorials आहेत - त्यापैकी ही एकाची लिंक ! 

दिवाळीच्या दिवसांमध्ये वेळ मिळालाच तर हे tutorial पाहा आणि मधूनमधून या Appचा सर्व करा.  आणखी एक करा. दिवाळी सुरु व्हायच्या आधीच, म्हणजे शनिवारी वगैरे, दिवाळीनंतर करायची सगळी कामं या App मध्ये नोंदवून ठेवा. कारण चार दिवस सुट्टी झाल्यानंतर तो जो एक हँगओव्हर येईल, त्यात एकही काम आठवणार नाही !

Todoist हे मी सुचवलेलं App आवडलं नाही, तर गुगल सर्च करून इतर Apps चा शोध घ्या. App वापरणं आवडत नसेल तर चक्क साध्या डायरीत नोंद करा. App काय किंवा डायरी काय, ही फक्त tools आहेत. महत्त्वाचं आहे, आपल्या कामाची एक पद्धत ठरवणे आणि कामाला एक शिस्त आणणे. बेशिस्तीमुळे ओघाने येणाऱ्या सर्व दुर्दैवी गोष्टी टाळण्यासाठी आणि आपल्या कामातील परिणामकारकता वाढवण्यासाठी हा सगळा ब्लॉग प्रपंच !   

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या अनेक अनेक शुभेच्छा ! तुमची मित्र मंडळी आणि तुमच्या कुटुंबासहित ही दिवाळी मस्त एन्जॉय करा. ही दिवाळी संपताच एक फ्रेश आणि अधिक productive व्यक्ती म्हणून तुम्ही तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी अधिक प्रयत्नशील व्हाल, यासाठी अनेक अनेक शुभेच्छा ! 

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

पिप्लंत्री ग्रामदूत - पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल

'बेटी धनाची पेटी' हे आपण ऐकतो, वाचतो. पण हे प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलं आहे पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल यांनी! त्यांनी...

काळजी वाहणारे Robot युग!

Robots बद्दल गेले अनेक वर्ष आपल्याला कुतूहल आहे. मानवी गरजा समजून त्यावर supercomputing च्या साहाय्याने emotional support देणारा robot बनवता आला...

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...