Get Better Each Week #1 - Welcome to Swayam Talks
×

Get Better Each Week #1

नविन काळे

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण जगापेक्षा एक पाऊल पुढे राहाल याची आम्ही खात्री देतो.
 

Published : 16 June, 2023

Get Better Each Week #1

भाजीवाल्या मावशी, स्टीव्ह जॉब्स आणि बिझनेस !

🌈 Thought of the Week 😇

मी आणि माझी पत्नी मुंबईपासून थोडं लांब असलेल्या एका ठिकाणी गेलो होतो.
ज्यांच्याकडे गेलो होतो त्यांचं गावात मोठं प्रस्थ होतं. त्यांच्या क्षेत्रात चांगलं नाव होतं. ते गृहस्थ चांगले होते. आमच्याशी सौजन्याने वागले.
त्यांनी तयार केलेली ती वस्तू आम्ही घेतली आणि पैसे दिले. म्हटलं तर व्यवहार पूर्ण झाला होता.
थोडं माफक बोलून उभ्या उभ्याच आम्ही त्यांचा निरोप घेऊन तिथून बाहेर पडलो.

तिथून घरी जाताना हायवेच्या कडेला काही माणसं ताज्या भाज्या आणि फळं घेऊन बसली होती.
यातलं मुंबईत काय मिळत नाही ? पण अशा ठिकाणी गाडी थांबवून थोडी खरेदी करणं mandatory असतं. बायकोला म्हटलं, खूप ऊन आहे. मी गाडीतच बसतो. हे पैसे घे आणि तूच पटकन जाऊन ये.'

मी पाच मिनिटं फोनवर मेसेजेस वगैरे चेक केले. पण तरीही बायकोचा पत्ता नाही. गाडीतून बाहेर पाहिलं तर भाजी विकणाऱ्या त्या मावशी आणि बायको यांच्या गप्पा काही केल्या थांबतच नव्हत्या. त्यात आंबे, जांभळं, करवंदं वगैरे या सगळ्याचं टेस्टिंग बायको एकटीच करत होती.

थोडं वैतागूनच मी गाडीच्या बाहेर पडलो आणि तिथे गेलो. माझी बायको जणू त्या गावातली असल्यासारखी त्यांच्या टीममधून बोलत होती. आम्हाला नको असलेल्या सगळ्या गोष्टी तोवर पिशवीत जमा झाल्या होत्या. मघाशी दिलेले पैसे संपले होते. बायकोने माझ्या खिशात हात घालून आणखी एक नोट घेतली.

'हा आंबा खाऊन बघा दादा !' मावशीने मला एक अख्खा आंबा खायला दिला.
आंब्याला नाही म्हणू नये. मी खायला घेताच मावशीने घोषणा केली, ताई ९७० झालेत.
या टोपलीतून तुम्हाला आवडतील ते दोन टाईपचे पापड / कुरडया उचला.
इतक्या कमी वेळात मावशीने पटापट हिशेब करून आम्हाला 'offer which we can't refuse' घ्यायला भाग पाडलं होतं. माझा आंबा खाऊन होतोय हे पाहून मावशी म्हणाल्या आवडला असेल तर आणखी एक घ्या ! आधीच्या आंब्याची कोय तोंडात तशीच ठेऊन मी हसून 'राहू दे' म्हटलं...

फणस निघेल ना चांगला ? माझ्या बायकोने नेहमीप्रमाणे मराठी माणसाचा एक फेव्हरेट बावळट प्रश्न विचारला.
मावशी म्हणाल्या, काही प्रॉब्लेम असेल तर परत घेऊन या. मी इथेच असते.
आम्ही दोघे हसलो.

तो भला मोठा फणस ठेवण्याच्या निमित्ताने मावशी गाडीजवळ आल्या.
आम्हाला बाय करताना म्हणाल्या, 'ओळख ठेवा. इथून पुन्हा गेलात तर माझ्याकडेच थांबा.'

आम्ही तिथून जाईपर्यंत मावशी हात उंचावून टाटा करत राहिल्या.

आधीच्या प्रसंगातही एक व्यवहार होता. या प्रसंगातही एक व्यवहार होता.
पण तरीही या दोन अनुभवांमध्ये फरक आहे.

बिझनेस म्हणजे नेमकं काय?
पैशांच्या मोबदल्यात गुड्स आणि सर्व्हिसेसची देवाणघेवाण ?
नक्कीच. ते तर आहेच महत्त्वाचं.
पण बिझनेस नावाचं ते मोठ्ठ जिगसॉ पझल पूर्ण होण्यासाठी आणखी एक पीस आवश्यक असतो.
तो पीस म्हणजे विक्रेता आणि ग्राहक यांचं त्या व्यवहारापलीकडे एक नातं निर्माण होणं.
ते नातं नसेल तर ती उरते फक्त एक देवाणघेवाण.
Apple चे प्रॉडक्ट्स वापरणारी मंडळी स्वतःला स्टीव्ह जॉब्सचे नातेवाईक समजतात ते याचसाठी. यातल्या कोणालाही स्टीव्ह जॉब्स प्रत्यक्ष भेटला असण्याची शक्यता शून्य आहे. पण तरीही Appleचे प्रॉडक्ट्स, त्यांची स्टोअर्स इतकंच काय, एखादी मौल्यवान गोष्ट ठेवावी असे त्यांचे प्रॉडक्ट बॉक्सेस तुमच्याशी बोलतात. इतर लोक मी लॅपटॉप वापरतो म्हणतात. Apple चे भक्त मी मॅक वापरतो म्हणतात. इतकं पझेसिव्ह नातं निर्माण करणारे उत्तम बिझनेस करतात हे मग ओघाने येतं.

चांगला बिझनेस करण्यासाठी अशी नाती निर्माण करायची असतात, हे त्या मावशींना माहीत नसावं म्हणूनच कदाचित त्या उत्तम बिझनेस करू शकत असाव्यात. हे आतून येतं. माणसांविषयीच्या प्रेमातून येतं.

माणसं आणि बिझनेस यामध्ये तुम्ही साध्य काय मानता आणि साधन काय मानता हा खरा differentiator असतो.

तुम्हाला काय वाटतं ?


🌐 Website of the Week 😎

Transkriptor: Content Creators साठी एक वरदान !

ही एक भन्नाट वेबसाईट आहे. हल्ली तुम्ही सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ पाहात असाल, ज्यामध्ये त्या व्हिडिओमधले शब्द त्याच भाषेत तुम्हाला स्क्रीनवर दिसतात. त्याला इंग्लिशमध्ये Transcript म्हणतात. त्याचा एक फायदा म्हणजे, तुम्ही आवाज बंद करून तो व्हिडीओ पाहू शकता किंवा काही लोकांना त्या व्हिडिओमध्ये सुरु असलेल्या गोष्टी समजायला थोडी मदत होते. व्हिडीओमधले शब्द ऐकून ते जसेच्या तसे लिहिणं हे कुठल्याही Content Creator साठी खूप त्रासाचं असतं. मात्र Transkriptor या वेबसाईटमुळे हे काम अक्षरशः चुटकीसरशी होतं. तुम्ही तुमचा ऑडिओ किंवा व्हिडीओ तिथल्या एका बॉक्समध्ये अपलोड करायचा आणि BOOM !! काही मिनिटांत तुम्हाला त्याचं Transcript मिळतं.

मराठी, हिंदी, इंग्लिश यासह जगातल्या सर्व प्रमुख भाषांमध्ये हे सॉफ्टवेअर काम करतं. फक्त एकच सूचना. पहिली ९० मिनिटे तुम्हाला मोफत मिळतात. यापुढे तुम्हाला त्यांची सेवा घ्यायची असेल तर तुम्हाला त्यांचं Paid Version घ्यावं लागतं.

https://app.transkriptor.com/


🖋️Quote to ponder 😌

Youtuber अली अब्दालने त्याच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलंय:

"An hour before 9 is worth 2 after 5."


तेव्हा मंडळी, भेटूया पुढल्या शुक्रवारी !

मंडळी, तुम्ही सुद्धा छान छान सिनेमा-वेबसिरीज पाहात असाल, पॉडकास्ट ऐकत असाल. पुस्तकं वाचत असाल. माणसांना भेटत असाल. प्रवास करत असाल. तुम्हाला ज्या गोष्टी interesting आणि inspiring वाटल्या त्या आम्हाला कळवा. जर त्या आम्हालाही आवडल्या तर आम्ही त्या तुमच्या नावासहित इथे देऊ. मग वाट कसली पाहताय? Content@swayamtalks.org वर तुमच्या गोष्टी आम्हाला पाठवा. त्यात तुमचे नाव, फोन नंबर आणि शहराचे नाव नक्की लिहा.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

पिप्लंत्री ग्रामदूत - पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल

'बेटी धनाची पेटी' हे आपण ऐकतो, वाचतो. पण हे प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलं आहे पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल यांनी! त्यांनी...

काळजी वाहणारे Robot युग!

Robots बद्दल गेले अनेक वर्ष आपल्याला कुतूहल आहे. मानवी गरजा समजून त्यावर supercomputing च्या साहाय्याने emotional support देणारा robot बनवता आला...

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...