Favourite Backup - Welcome to Swayam Talks
×

Favourite Backup

वैष्णवी कानिटकर

नव्या जगात सतत नवनवे शब्द आणि नव्या संज्ञा आपल्या कानांवर आदळत असतात. त्यातल्या काहींसोबत आपण घट्ट बांधले जातो इतक्या त्या आपल्या रोजच्या जगण्याशी निगडित असतात. अशाच एका #hashtag संज्ञेबद्दल सांगतेय वैष्णवी कानिटकर
 

Published : 1 February, 2021

Favourite Backup

हल्लीच Social media वर दोनतीन ठिकाणी मी #favouritebackup हा शब्द वाचला आणि लगेचच मी त्याला relate झाले. त्वरित गुगलमावशीला त्याचा अर्थ विचारला आणि उत्तर आले … 'A person or a thing that can be used to replace or support another person or thing.' तसा 'Backup' हा शब्द आपल्या सगळ्यांच्या चांगल्या परिचयाचा आहे, आपण तो अगदी रोजही वापरतो, शब्दांतून आणि कृतीतूनही.

काही दिवसांपूर्वी पर्यंत backup हा शब्द, career चा backup, जेवायला जाण्यासाठी restaurant चा backup किंवा परीक्षेच्या वेळेस backup म्हणून लागणारे अधिकचे पेन या अर्थांपर्यंतच वापरला जात होता. पण जेव्हा आपल्या मैत्रीमध्ये किंवा एखाद्या नात्यामध्ये हा शब्द येऊ लागला, तेव्हा या शब्दाचे कंगोरे आणि अर्थ किती आहेत हे नीट समजायला लागलं. आपण खोलवर विचार केल्यावर किंवा त्या अनुभवातून गेल्यावरच त्यातला गर्भितार्थ कळेल. Lockdown च्या वेळेस ही गोष्ट माझ्या लक्षात आली आणि कितीतरी लोक या concept मध्ये अडकले आहेत हे लक्षात आले.

Favourite Backup ही concept माझ्यासाठीही नवीनच होती. आपली नेहमीची आवडती व्यक्ती उपलब्ध नसताना, वेळ घालवायला म्हणून इतर कुठल्यातरी व्यक्तीला भेटायला बोलावणे किंवा अशा व्यक्तीला फोन करणे इथपासून या प्रकाराची सुरुवात होते. मी स्वतःही ते केलेले आहे. पण आपल्याही बाबतीत जेव्हा असे कोणीतरी वागते तेव्हा आपण इतके दिवस कळत नकळत जे काही करत होतो ते लक्षात येते.

"आज मला काहीच काम नव्हते म्हणून तुला call केला" किंवा " ऐक ना माझा plan cancel झाला आहे तर आपण भेटूया का?" या वाक्यांपासून त्याची सुरुवात होते आणि मग आपण त्यात कधी अडकत जातो ते कळतच नाही. मी या गोष्टीचा बराच विचार केला, त्याबद्दल बरीच माहिती वाचली, त्याच्याशी निगडित पुस्तके चाळली आणि माझ्या लक्षात आले की या सगळ्यामध्ये खरंतर बव्हंशी चूक जे backup होतात त्यांची सुद्धा आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांनी स्वतःपेक्षा दुसऱ्या व्यक्तींना दिलेले अनावश्यक महत्त्व.

ज्यावेळी आपण आपली हातातली कामे सोडून दुसऱ्यांना वेळ द्यायला लागतो तेव्हा ती माणसे आपल्याला गृहित धरायला लागतात आणि "ही व्यक्ती काय कधीही call केला तरी available असणारच, ही आपल्याला थोडीच नाही म्हणणार?" अशा पद्धतीचा विचार सुरु होतो. त्यातच जी व्यक्ती backup असते त्या व्यक्तीला असं वाटत राहतं की आपण ह्या वेळी available नाही झालो तर पुन्हा आपल्याला हे लोक विचारणार नाहीत. हे एक खूप विचित्र पध्दतीचं दुष्टचक्र आहे. ते आपण तोडलं नाही तर आपण त्यात अडकून पडू आणि आपल्या आयुष्यातला सर्वोत्तम वेळ गमावून बसू.

बऱ्याचदा आपण आपली कामे बाजूला टाकून, इतरांसाठी available होतो आणि नंतर ते लोक आपल्याला विसरुनही जातात. आपली गरज असेल तेव्हा ती माणसे आपल्यासोबत नसतील आणि त्यांची priority वेगळ्याच लोकांना असेल तर त्या क्षणी आपण यात अडकतोय हे समजून जावे. अर्थातच काही emergency असेल तर तो भाग वेगळा झाला पण कोणीही उगाचच त्यांचा वेळ जात नाहीये म्हणून किंवा त्यांचे आवडीचे लोक आता उपलब्ध नाहीयेत म्हणून आपला वापर तर करून घेत नाही ना? हे लक्षात घेणे गरजेचे आहे. कारण या सगळ्या process मध्ये आपण आपली ऊर्जा आणि वेळ खूप वाया घालवत असतो आणि नको त्या व्यक्तींच्या मैत्रीमध्ये गुंतून पडतो. आपणच स्वतःला अग्रक्रम देणे गरजेचे आहे अन्यथा इतर कोणीही आपल्याला तो देणार नाही.

जर आपल्याला “आपण एकटे काय करणार, खूप bore होतं" असं feeling येत असेल आणि स्वतःलाच स्वतःची company आवडत नसेल तर लोकांना का आवडेल याचाही विचार करणे गरजेचे आहे. बऱ्याचदा बोलायला विषय नसल्याने किंवा कोणत्याच आवडीनिवडी न जोपासल्याने आपण एकटे पडण्याची शक्यता असते. आपण कुणाचे favourite backup होत नाही आहोत ना? या सोबतच आपण इतर कोणाला आपले favourite backup करत नाही ना याचाही डोळसपणे विचार करायला हवा.

Favourite Backup होणे ही काही वाईट गोष्ट नाही पण आपण आपला वेळ नक्की कशामध्ये invest करत आहोत आणि किती वेळ वाया घालवत आहोत हे लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. यामध्ये आपण आपली ओळख आणि अस्तित्व हरवत नाहीये ना? ते शोधायला हवे. यातून बाहेर पडायचे काही उत्तम मार्ग आहेत. त्या पैकी काही मार्ग म्हणजे चांगली पुस्तकं वाचणे, एकट्याने फिरायला जाणे आणि जगात काय नवीन घडतं आहे याचा धांडोळा घेणे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला update राहायला मदत करतात आणि इतर वायफळ गोष्टींत वेळ वाया न घालवता तुमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याकरिता मदत करतात.

लोकांचा स्वभाव बदलणे तर शक्य नाही पण आपण स्वतःमध्ये नक्कीच बदल करू शकतो आणि जेव्हा आपण स्वतःला महत्त्व देतो तेव्हा लोकही आपल्याला महत्त्व देतात हे नक्कीच आणि तेव्हा आपण favourite backup न राहता priority होऊन जातो.

वैष्णवी कानिटकर

लेखिका ही 'स्वयं टाॅक्स' च्या content team ची सदस्य आहे.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

तरुणाईतील ‘स्वयं’साठी!

तरुणपण जगण्याचा एक मार्ग म्हणजे या तरुणाईशी जोडलं जाणं. या पिढीतील बदलला सामोरं जाताना, त्यांना जर आपण आज मित्रत्वाचा...

वर्ल्ड वाईड वेब खरंच वर्ल्ड वाईड आहे का?

जसं अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत, तसंच इंटरनेटही नव्या पिढीची गरज बनली आहे. आज आपण इंटरनेट च्या जगात...

संगीत आणि नात्याची सुंदर ‘अमेरिकन सिंफनी’!

OTT च्या काळात अनेक पर्याय उपलब्ध असताना मोजक्या वेळात नक्की काय ‘पाहायचं’ हा सध्या सतावणारा प्रश्न आहे. अशावेळी ‘अमेरिकन...