चेहरा हाच यशस्वी Brand - Welcome to Swayam Talks
×

चेहरा हाच यशस्वी Brand

पराग खोत

एखादा अनोळखी चेहरा हा Product Brand होऊ शकतो का? एका भारतीय Brand ने हे सिद्ध करुन दाखवलंय.  नुकतेच निधन पावलेल्या ‘MDH च्या महाशय धरमपाल गुलाटी’ यांच्याबद्दलचा पराग खोत याचा हा लेख.
 

Published : 7 December, 2020

चेहरा हाच यशस्वी Brand

एखादा अनोळखी चेहरा हा Product Brand होऊ शकतो का? एका भारतीय Brand ने हे सिद्ध करुन दाखवलंय. नुकतेचनिधन पावलेल्या 'MDH च्या महाशय धरमपाल गुलाटी' यांच्याबद्दलचा पराग खोत याचा हा लेख.

Product Advertising and Branding हा खूप गहन विषय आहे. व्यवसाय समृद्धी आणि मजबूत अर्थकारण या बाबी संलग्न असल्याने Branding ला विशेष महत्त्व आहे. एखादा प्रथितयश कलाकार किंवा यशस्वी model आपल्या ब्रॅन्डचा चेहरा असावा यासाठी कंपन्यांमधे चढाओढ सुरु असते. एखाद्या आडनावाने Brands मोठे झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. Ford Motors, Kodak, Adidas आदि परदेशी तर Tata, Birla, Bajaj हे देशी Brands सुप्रसिद्ध आहेत. पण फक्त चेहरा ओळखीचा आहे आणि नाव कदाचित माहित नाही असेही काही लोकप्रिय झालेले Brands आहेत. काही मोजक्याच परदेशी Brands नी हे शक्य करुन दाखवलंय. KFC हे त्यातलं एक ठळक उदाहरण. KFC च्या लोगोवर दिसणारा तो मिश्किल चेहरा हा त्याचा जनक असलेल्या Colonel Sanders चा आहे हे बऱ्याच जणांना ठाऊक नसेल. पण तो चेहरा दिसला की KFC ची हटकून आठवण येते आणि तोंडाला पाणी सुटते, हेच त्याचे वैशिष्ट्य.

असाच एक भारतीय ब्रॅन्ड गेली कित्येक वर्षे जनमानसात लोकप्रिय आहे. मसाला उत्पादनामुळे घराघरात पोहोचलेला MDH मसाले हा ब्रॅन्ड, हे एक अद्वितीय उदाहरण म्हणावे लागेल. गृहिणींचा स्वयंपाकाचा त्रास काही अंशी कमी व्हावा म्हणून तयार मसाल्याची विक्री सुरु झाली होती आणि मग या क्षेत्रात मुसंडी मारुन आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या या कंपनीला भारतीय महिलांनी भक्कम पाठिंबा दिला. तीच आपुलकी आणि जिव्हाळा अधिक घट्ट करण्याचे काम यशस्वीपणे केले ते या Brands शी जोडल्या गेलेल्या एका चेहऱ्याने. 'MDH के चाचा' किंवा 'MDH चे आजोबा' हीच या चेहऱ्याची ओळख. त्यांचे खरे नाव काय? ते कोण आहेत हे अनेकांना ठाऊक नव्हतं. इतकंच नाही तर MDH हे कशाचे लघुरुप आहे याचाही पत्ता नव्हता. 'असली मसाले सच सच, MDH MDH' असे यमक जुळवत, आपल्या मसाल्याची जाहिरात करणारे एक प्रेमळ आजोबा हीच प्रतिमा आपल्या मनावर कोरली गेलीय आणि त्याच एका चेहऱ्याने आज MDH ची उलाढाल एक हजार कोटींवर नेऊन ठेवलीय. यात त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता आणि ग्राहकांची पसंती यांचा सहभाग असला तरी त्या चेहऱ्याने केलेली जादू आणि जोडलेली माणसं याचे श्रेय अधिक आहे.

महाशय धरमपाल गुलाटी या MDH च्या मालकांचे ३ डिसेंबर २०२० रोजी वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. हेच ते MDH चे जाहिरातीत दिसणारे आजोबा. सियालकोट मध्ये जन्मलेले धरमपाल वडिलांना व्यवसायात मदत करत. ते फाळणीनंतर भारतात आले आणि त्यांनी छोटीमोठी कामे करण्यास प्रारंभ केला. दिल्लीत त्यांनी टांगादेखील चालवला. नंतर एका छोट्याशा दुकानात त्यांनी त्यांचा वडिलोपार्जित मसाल्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु केला आणि आपल्या अथक परिश्रमांनी त्याचा विस्तार केला. कालांतराने ते 'मसाला किंग' म्हणून ओळखले जाऊ लागले. Mahashiyan Di Hatti (म्हणजे Gentleman's Shop) याचे लघुरुप म्हणजे MDH. पण या कशाचाही पत्ता नसताना कोट्यवधी माणसे केवळ त्या चेहऱ्याशी जोडली गेली आणि त्यांची उत्पादने घेत राहिली. त्यांचा चेहरा जाहिरातीसाठी घेणे हा सुद्धा निव्वळ एक अपघात होता. त्या दिवशी नियोजित model आला नाही आणि म्हणून गुलाटीजी स्वत:च कॅमेऱ्यासमोर उभे राहिले आणि तेच MDH चा शुभंकर चेहरा झाले. त्या चेहऱ्यामागचा सच्चेपणा गुलाटीजींनी खऱ्या आयुष्यातही जपला. आपल्याला दरमहा मिळणाऱ्या वैयक्तिक कमाईचा ९०% हिस्सा त्यांनी सामाजिक कार्यासाठी दान केला. दवाखाने आणि इस्पितळं उभारली. अनेकांना मदत केली. आपण जी मूल्यं जपतो त्या मूल्यांना त्यांनी मूर्त स्वरुप दिलं. सचोटी, पारदर्शिता आणि सामान्यांविषयीची कळकळ हे सगळं MDH च्या उत्पादनांची गुणवत्ता आणि किंमती या मधून प्रतीत होत राहिलं. या त्यांच्या कार्याचा गौरव २०१९ साली पद्मभूषण पुरस्काराने केला गेला.

एखादा चेहरा हा ब्रॅन्ड होऊ शकतो का? या Advertising क्षेत्रातल्या महत्त्वाच्या प्रश्नाला MDH ने त्यांच्या कृतीतून 'होय' असं खणखणीत उत्तर दिलं. विशेषत: तो चेहरा अनोळखी असताना, तो एखाद्या प्रसिद्ध नटाचा किंवा खेळाडूचा नसताना किंवा तो तरुण आणि सुंदर नसतानाही, इतकी वर्षे ग्राहकांच्या मनात घर करुन राहिला आणि यापुढेही राहील. Branding चे प्रचलित नियम बदलणाऱ्या आणि स्वत:च एक यशस्वी brand झालेल्या, महाशय धरमपाल गुलाटींना ही विनम्र आदरांजली.

- पराग खोत

लेखक हे स्वयं च्या Content Team चे सदस्य आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...

चांगुलपणाची प्रतिमा : मिसेस हॅरिस

कधी उगाच उदास वाटतं, माणुसकी, चांगुलपणा यावरचा विश्वास कमी व्हायला लागतो, उगीच चिडचिड होत असते, राग राग करून काही होणार...

स्वच्छतादूत : पद्मश्री एस. दामोदरन

दक्षिण भारतातील ६०० हून अधिक गावे आणि २०० पेक्षा अधिक झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना उघड्यावर शौच करण्यापासून परावृत्त...