स्वप्नं बघा ! - Welcome to Swayam Talks
×

स्वप्नं बघा !

आशय महाजन

सात वर्षांपूर्वी पाहिलेल्या ‘स्वयं’ नावाच्या एका ‘वेड्या स्वप्ना’विषयी सांगतोय, त्या स्वप्नाचा साक्षीदार आशय महाजन.  स्वप्नांची एक गंमत असते. आपण जर कोणाला आपलं स्वप्न सांगितलं तर पहिल्यांदा सगळेजण हसतात, चेष्टा करतात. पण जर आपला आपल्या स्वप्नांवर विश्वास असेल तर लोक कितीही हसले तरी त्या स्वप्नांच्या पाठी धावण्यात खरी मजा आहे.स्वयंचं काहीसं असंच आहे… २०१३ च्या जून […]
 

Published : 27 July, 2020

स्वप्नं बघा !

सात वर्षांपूर्वी पाहिलेल्या 'स्वयं' नावाच्या एका 'वेड्या स्वप्ना'विषयी सांगतोय, त्या स्वप्नाचा साक्षीदार आशय महाजन. 

स्वप्नांची एक गंमत असते. आपण जर कोणाला आपलं स्वप्न सांगितलं तर पहिल्यांदा सगळेजण हसतात, चेष्टा करतात. पण जर आपला आपल्या स्वप्नांवर विश्वास असेल तर लोक कितीही हसले तरी त्या स्वप्नांच्या पाठी धावण्यात खरी मजा आहे.स्वयंचं काहीसं असंच आहे…

२०१३ च्या जून महिन्यात नविनने पहिल्यांदा 'स्वयं'ची कल्पना आम्हा मित्रांसमोर मांडली. 'भाषणाच्या कार्यक्रमाला' एका नव्या उंचीवर घेऊन जायची त्याची इच्छा होती. आमच्यातल्या काही जणांनी 'foolish idea' म्हणून straight उडवून लावलं. काही जणांनी सुचवलं की, format थोडा Indianise करावा. पण नेहमीप्रमाणे नविनचे standards थोडे जास्तच high होते. पहिलं म्हणजे, हा कार्यक्रम आपल्याकडे होणाऱ्या इतर भाषणांच्या कार्यक्रमाप्रमाणे 'फुकट' नसावा आणि लोकांनी आपला कार्यक्रम ऐकण्यासाठी चक्क पैसे देऊन तिकीट काढावं. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या व्यक्ती व कल्पना या व्यासपीठावर येतील, त्या सर्वस्व नवीन असाव्यात. ह्या दोन्ही अटी ऐकल्यावर तर सगळ्यांनी त्याला समजावलं की 'स्वयं'चा नाद त्याने सोडून द्यावा.नविनला घरातनं मात्र support मिळाला. नविनच्या बाबांनी त्याच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं. २०१४ च्या जानेवारी पासून स्वयंची सुरुवात होणार हे ठरलं. ५ जानेवारी 'पुणे स्वयं' आणि १२ जानेवारी 'मुंबई स्वयं' ह्या dates fix झाल्या. 'स्वयं'मध्ये कोण कोण बोलणार, त्यांच्या बरोबर discussions ची process एकीकडे चालु झाली. पहिल्याच वर्षी 12 speakers आणि 2 स्वयं back to back weekends ना ! थोडा over ambitious plan होता. Moderators म्हणून डॉ. उदय निरगुडकर आणि अच्युत गोडबोले यांनी होकार कळवला.खरी लढाई होती ती sponsors मिळवायची आणि लोकांना कार्यक्रमाला कसं आणायचं याची !  Sponsorsशी बोलताना हे जाणवलं की त्यांना कार्यक्रमाची संकल्पना आवडत्ये पण त्यांनाही हाच प्रश्न पडलाय,  की इतकी व्याख्याने फुकट होत असताना लोक पैसे देऊन स्वयंला गर्दी करतील का? माधवबाग सारखे काही sponsors पुढे आले पण स्वयंच्या खर्चासमोर sponsorship रक्कम  फारच कमी होती. आता शेवटची आशा म्हणजे लोकांनी कार्यक्रमाला येणं. नविन त्याकाळात भरपूर फिरला. भरपूर लोकांना personally भेटून त्याने convince करण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी interest दाखवला. काही लोकांनी फक्त कौतुक केलं पण auditorium भरेल इतकी लोकं  अजूनही झाली नव्हती. अश्याच वेळेला नविन पुणे विद्यापीठात गेला आणि तिथे त्याला एका विभागात चांगला प्रतिसाद मिळाला. त्या विभागाने आश्वासन दिलं की २०० मुलं तरी नक्की येतील स्वयंला !५ जानेवारी २०१४ हा दिवस उजाडला. सगळी तयारी झाली होती आणि आम्ही सगळे मित्र नविन बरोबर दहा वाजण्याची वाट बघत होतो. Speakers, moderators आणि काही प्रेक्षक आले होते. आम्ही सर्वजण पुणे विद्यापीठाच्या त्या २०० मुलांची वाट बघत होतो. सहज चौकशी म्हणून नविनने संबंधित शिक्षकांना फोन केला आणि तिकडचा आवाज ऐकुन नविनचा चेहरा पडला. ५ जानेवारी हा रविवार आहे हे ते गृहस्थ विसरले होते आणि त्यामुळे २०० पैकी एकही Student येणार नव्हता. नविन आणि आम्ही सगळे मित्र disappoint झालो. पण 'स्वयं'चा कार्यक्रम काही थोड्या पण आशावादी प्रेक्षकांसमोर झाला. मुंबईचा स्वयं कार्यक्रमही पुण्याच्या स्वयं सारखा जेमतेम sponsors आणि मोजक्या प्रेक्षकांसमोर झाला.शेवटी जेव्हा पुणे आणि मुंबई स्वयं कार्यक्रमाचे गणित मांडले तेव्हा कळलं की 'काही लाखांचं  नुकसान' झालं आहे. २०१४ मध्ये एका मध्यवर्गीय कुटुंबाला एक कल्पक उपक्रम राबवण्यासाठी ती किंमत जरा जास्तच होती. पण स्वप्नांच्या बाबतीत मला नेहमी वाटतं ही जी सुरवातीची विघ्नं तो परमेश्वर आणतो, ते कदाचित तुमच्या स्वप्नांवर तुमचाच किती विश्वास आहे हे test करण्यासाठी असेल कदाचित. काळे परिवाराने हे नुकसान कोणालाही blame न करता हसत हसत स्वीकारलं.

आज हळू हळू का होईना, 'स्वयं' एका नव्या उंचीवर जातंय. Housefull कार्यक्रम, जवळ जवळ दीड लाख Youtube Subscribers, खुप सुंदर टीम हे सगळं सात वर्षानंतर 'स्वयं'चं रूप आहे. टीममध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला 'स्वयं' रोज काही तरी नवीन शिकवतंय. त्यामुळे 'स्वयं'मध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाच्या वतीने मी नविन आणि अनिल काकांना thanks म्हणतो. की इतकं सुंदर स्वप्न त्यांनी पहिल्याच वर्षी मरू दिलं नाही.

- आशय महाजन

The writer is Adventure & Fitness Enthusiast and Co-founder of Swayam Talks.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...

चांगुलपणाची प्रतिमा : मिसेस हॅरिस

कधी उगाच उदास वाटतं, माणुसकी, चांगुलपणा यावरचा विश्वास कमी व्हायला लागतो, उगीच चिडचिड होत असते, राग राग करून काही होणार...

स्वच्छतादूत : पद्मश्री एस. दामोदरन

दक्षिण भारतातील ६०० हून अधिक गावे आणि २०० पेक्षा अधिक झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना उघड्यावर शौच करण्यापासून परावृत्त...