App about us - Welcome to Swayam Talks
×

‘स्वयं’विषयी

गोष्ट ऐकणं सर्वांनाच आवडतं. आम्हालाही आवडतं. पण गोष्टी ‘सांगणं’, आम्हाला जास्त आवडतं !

त्याही खऱ्याखुऱ्या. काल्पनिक नाहीत. अशा गोष्टी, ज्या आपल्याच आजूबाजूच्या भन्नाट माणसांच्या आहेत. अशा गोष्टी, ज्या ऐकून तुम्हाला प्रेरणा मिळेल, जगण्याची नवीन दृष्टी मिळेल.

गोष्ट सांगण्याच्या याच उर्मीतून ‘स्वयं’चा जन्म झाला !

ज्ञान-तंत्रज्ञान, उद्योग, सामाजिक, क्रीडा, कला, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या अफलातून लोकांच्या गोष्टी तुम्हाला ‘स्वयं डिजिटल’वर प्रत्यक्ष त्याच माणसांच्या तोंडून ऐकता आणि पाहता येणार आहेत.

केवळ डिजिटल माध्यमांद्वारेच नव्हे, तर महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमध्ये होणाऱ्या LIVE कार्यक्रमांच्या माध्यमांतून ‘स्वयं’ने आपला एक खास प्रेक्षक तयार केला आहे. आजवर ‘स्वयं’चे LIVE कार्यक्रम मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, सोलापूर अशा विविध शहरांत झाले  असून महाराष्ट्रातील प्रेक्षक दरवर्षी ‘स्वयं’च्या कार्यक्रमांची आतुरतेने वाट पाहत असतात.        

आपल्या देशात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणारे ‘आजचे’ Role Models शोधून त्यांचे कार्य  समाजासमोर अत्यंत प्रभावी पद्धतीने सादर करणे व समाजात उद्यमशीलता (Entrepreneurship) आणि नवोन्मेषाचे (Innovation) वातावरण निर्माण करत एक ज्ञानसंपन्न समाज निर्माण करणे हे ‘स्वयं’च्या संपूर्ण कामाचे उद्दिष्ट आहे. 

अर्थातच हे सर्व काम एकट्या-दुकट्याचे नाही. अत्यंत कार्यक्षम, उत्साही व संवेदनशील अशी आमची ‘स्वयं टीम’ २०१४ पासून हे काम अत्यंत आनंदाने व अभिमानाने करत आहे. आपल्याला आमचा हा प्रयत्न भावला असेल तर आपणही ‘स्वयं’च्या या उपक्रमामध्ये आयोजक, प्रायोजक, प्रेक्षक वा वक्ता म्हणून सामील होऊ शकता. 

‘स्वयं’च्या या कार्याबद्दल आपल्याला काय वाटतंय, हे आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. info@swayamtalks.org या ईमेल आयडीवर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. 

पुन्हा एकदा, 

‘स्वयं’ परिवारात आपले स्वागत आहे !