About Us Old - Welcome to Swayam Talks
×

‘इकिगाई’ – आमचा प्रेरणास्रोत

‘इकिगाई’ ही एक जपानी संकल्पना आहे.
‘इकिगाई’ म्हणजे आपल्या जगण्याचे प्रयोजन !
‘स्वयं’मध्ये आम्हाला आमचा ‘इकिगाई’ सापडला आहे.

ikigai

‘स्वयं’ ची आवश्यकता

भारत देश संक्रमणातून जात आहे. सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला हा देश आता संपूर्ण जगाच्या उत्सुकतेचा विषय ठरत आहे. जागतिकीकरण, तंत्रज्ञानाचा विकास, शिक्षणाचा प्रसार या गोष्टींमुळे आज ज्ञानाचं लोकशाहीकरण झालंय. यापुढे माणसांचे वर्गीकरण श्रीमंत-गरीब असे न होता ‘मनासारखे जगणारे’ आणि ‘मन मारून जगणारे’ असे होणार आहे. भारतात याची नांदी झाली आहे.

म्हणुनच अशा मनस्वी जगणा-या माणसांचा प्रवास, त्यांचे जगण्याविषयीचे प्रयोग, त्यांनी आजच्या समस्यांवर शोधलेली उत्तरं, त्यांच्या अफलातून कल्पना, त्यांची जिद्द, धडाडी यांनी परिपूर्ण असा हा अभूतपूर्व काळ कुठेतरी शब्दबद्ध व्हायची, ‘capture’ व्हायची आज नितांत गरज आहे.

येणा-या युगात असे प्रेरणादायी विचार समाजामध्ये झिरपत भविष्यात एक संवेदनशील, ज्ञानसंपन्न व उद्यमशील समाज तयार होणे हे ‘स्वयं’चे स्वप्न आहे.

आणि म्हणूनच ‘स्वयं’ ही चळवळ चालू राहणे ही येणा-या काळाची गरज असणार आहे.

‘स्वयं’ मार्गदर्शक

‘स्वयं’च्या अगदी पहिल्या कार्यक्रमापासून ते आजतागायत या दोन्ही महनीय व्यक्ती मार्गदर्शक या नात्याने आमच्यासोबत आहेत हा आमचा बहुमान आहे. ‘स्वयं’ ही संकल्पना वर्धिष्णू होण्यात त्यांचे अमुल्य योगदान आहे.

डॉ. उदय निरगुडकर

डॉ. उदय निरगुडकरांचा परिचय आपल्या सर्वांना आहेच. शिक्षण, संस्कृती व प्रसारमाध्यम क्षेत्रांमधील एक आदरणीय व्यक्तिमत्व असणाऱ्या डॉ. उदय निरगुडकरांचा आय. टी., कला, राजकारण, उद्योग, संस्कृती अशा विविध क्षेत्रात गाढा अभ्यास आहे.

‘स्वयं’च्या प्रत्येक कार्यक्रमात ‘मार्गदर्शक वक्ता’ या नात्याने डॉ. उदय निरगुडकर प्रत्येक वक्त्याशी अत्यंत अभ्यासपूर्ण व मार्मिक संवाद साधतात. यामुळे उपस्थित प्रेक्षकांना संबंधित वक्त्याबद्दल सखोल माहिती मिळण्यास मदत होते.

श्री. उमेश श्रीखंडे

जाहिरात व माध्यम क्षेत्रातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व. सध्या Taproot Dentsu India या प्रतिथयश जाहिरात कंपनीचे CEO म्हणून कार्यरत. फेसबुक, पार्ले, डिस्ने, बजाज ऑटो, कॅडबरी, उबर, मॅरिको, ITC, युरेका फोर्ब्स अशा अनेक मोठ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सचे सल्लागार, Advertising Standards Council of India चे Board member. तसेच अनेक लहान व्यावसायिक, सामाजिक संस्था, बिझनेस स्कुल्स व विद्यार्थ्यांचे मानद सल्लागार.

टीम ‘स्वयं’

नविन काळे

सह-संस्थापक व क्रिएटिव्ह हेड

आशय महाजन

सह-संस्थापक व बिझनेस हेड

दिपाली पाटील

मॅनेजर- ऑपरेशन्स

श्रेया शेट्टी

एक्झिक्युटिव्ह – सोशल मीडिया

गोष्ट ऐकायला कोणाला आवडत नाही ? आम्हालाही आवडतं. पण आम्हाला गोष्ट ‘सांगायला’ जास्त आवडतं !

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या पण कुणाला फारशा माहीत नसलेल्या

अफलातून गोष्टी शोधत आम्ही फिरतो. पण या गोष्टी परिकथेतल्या नाहीत!

या गोष्टी आहेत माणसांच्या. त्यांच्या ‘पॅशन’ च्या ! त्यांच्या जिद्दीच्या !

त्यांच्यात असलेल्या अथांग करुणेच्या !

त्यांनी आयुष्यात केलेल्या विविध प्रयोगांच्या !

गोष्टी… ज्या आपल्याला जगण्याची एक नवीन उमेद देतात !

गोष्टी… ज्या आपल्यात एक आशेचा दिवा लावतात !

गोष्ट सांगण्याच्या याच उर्मीतून ‘स्वयं’चा जन्म झाला !

आमची गोष्ट अधिक रंजक व्हावी, यासाठी आम्ही दोन माध्यमे निवडली आहेत !

‘स्वयं’ टॉक्स

विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत भरीव काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार – त्यांच्या ‘ मातृभाषेत ’ मांडायचे व्यासपीठ म्हणजेच ‘ स्वयं टॉक्स ’ !

५ जानेवारी २०१४ या दिवशी सुरु झालेला ‘स्वयं टॉक्स ’ हा कार्यक्रम आता मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, सोलापूर या महाराष्ट्राच्या महत्वाच्या शहरांमध्ये होत आहे.

‘स्वयं टॉक्स’ मध्ये व्यक्त झालेले विचार सर्वदूर पोहोचावेत यासाठी आमचे सर्व कार्यक्रम Swayam Talks या आमच्य channel वर उपलब्ध असतात.

‘स्वयं’ टॉकीज

एखादी गोष्ट अतिशय आकर्षक पद्धतीने मांडण्याची ताकद दृश्यमाध्यमात (Visual medium) प्रचंड असते.

म्हणूनच आम्ही ‘स्वयं स्टोरीज्’च्या माध्यमातून या देशातील काही अफलातून माणसे व अनोखी ठिकाणे छोट्या छोट्या फिल्म्समधून मांडतो.

यासाठी आमची टीम प्रत्यक्ष प्रवास करून, संबधित व्यक्तींच्या भेटी घेऊन त्या फिल्मची निर्मिती करते. ‘केवळ पाच ते सहा मिनिटांचा एक प्रेरणादायी चित्रपट पुन्हा नव्याने जगण्याची उर्जा देतो’ असे आमचे प्रेक्षक कळवतात.