आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना ! - Welcome to Swayam Talks
×

आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना !

नविन काळे

गुढी पाडव्याच्या निमित्ताने आम्ही उद्यापासून 'स्वयं डिजिटल Gift Card' च्या अभिनव योजनेचा शुभारंभ करतोय. 'आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना' हे स्वयं Gift Card चं ब्रीदवाक्य आहे. 'स्वयं'ने आपल्या आयुष्यात किंचितसा जरी आनंद पेरला असेल तर तुमच्या प्रियजनांना 'बी-घडवण्यासाठी' तुम्ही घरबसल्या, केवळ एका क्लिकवर 'स्वयं डिजिटल'चे Gift Card पाठवू शकणार आहात. याविषयी अधिक सांगतोय, नविन काळे.
 

Published : 12 April, 2021

आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना !

'गिफ्ट' म्हणून एखाद्याला काय द्यायचं, हा प्रश्न मला अनेकदा सतावतो. एखादी वस्तू द्यायची म्हटलं तर हल्ली सगळ्यांकडे 'सगळं' असतं. आमचं लग्न झाल्यापासून आजवर आम्ही कपबश्या विकत घेतल्याचं मला स्मरत नाही. तीच तऱ्हा बेडशीट्स, वॉल क्लॉक्स, शोपीस, फुलदाण्या आणि किचन सेट्सची. (पत्रिकेत 'आहेर आणू नये' असून ही अवस्था ! )

'Whatsapp मेसेजेस फॉरवर्ड करणं' वगैरे आत्ताआत्ता आलं, पण भेटवस्तू फॉरवर्ड करणं (कधीकधी तर, आहे त्या 'गिफ्ट रॅपर' सकट) हे सनातन काळापासून चालत आलंय. ‘त्यांनी मागच्या वर्षी पाकिटात पाचशे एकच घातले होते, तेव्हा त्यांना देताना त्याहून अधिक नको' ही तर या क्षेत्रातील PHD !

तुम्हाला एक गंमत सांगतो. तुम्ही कधी अनिल अवचटांकडे गेलात तर तुम्हाला ते 'भेट' म्हणून कविता वाचून दाखवतात, बासरीवर एखादं गाणं वाजवून दाखवतात. मला हा प्रकारच भन्नाट वाटतो. अवचट 'वस्तूंच्या' पलीकडे गेलेत. त्यांनी त्या कृतीतील Crux पकडलाय - कुठलीही अपेक्षा न करता, दुसऱ्याला निखळ आनंद देणे !

हे तुम्हाला जमलं तर तुमच्यासारखे तुम्हीच ! मला तुमचा हेवा वाटेल !

पण कृतज्ञता व्यक्त करायला, शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला अजूनही काही माध्यम आवश्यक वाटत असेल तर Gift देण्याचा एक नवा पर्याय तुमच्यासमोर ठेवतोय - 'स्वयं डिजिटल'चा ! एखाद्याला सुंदर पुस्तक द्यावं, सुगंधी अत्तराची कुपी द्यावी, हिरवंगार रोप द्यावं त्याप्रमाणे स्वयं मधील Fresh Ideas आणि भन्नाट माणसांचे विचार तुम्ही आता उद्यापासून चक्क 'गिफ्ट' करू शकणार आहात !

उद्याच्या गुढी पाडव्याच्या निमित्ताने सादर करतोय 'स्वयं डिजिटल' Gift Card ! म्हणजे तुमच्या प्रियजनांना, मित्रमंडळींना, छोट्या दोस्तांना तुम्ही 'स्वयं डिजिटल' ची वार्षिक वर्गणी भेट म्हणून देऊ शकणार आहात ! तेही सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर न पडता, फक्त एका क्लिकवर !
आणि काही क्षणांत ते जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलेल्या तुमच्या प्रिय व्यक्तीच्या इनबॉक्समध्ये पोहोचणार आहे ! आहे की नाही मस्त?

विशेष म्हणजे, तुम्ही जितकी जास्त Gift Cards खरेदी कराल तितकी जास्त सवलत तुम्हाला मिळणार आहे. शिवाय, तुम्ही परदेशात असाल तर अमेरिकन/सिंगापूर/ ऑस्ट्रेलियन डॉलर, ब्रिटिश पाऊंड, युरो व दिरहॅम अशा सात निरनिराळ्या Currencies मध्ये ते Gift Card घेता येणार आहे.
https://swayamtalks.org/ या आमच्या वेबसाईटवर तिथल्या मेन्यूमध्ये जाऊन 'Buy Gift Card' हा ऑप्शन निवडा. तुम्ही तिथे हवी तितकी Gift cards खरेदी करून तुमच्या प्रियजनांना ईमेलवर अगदी सहज पाठवू शकता. आणखी एक. हे Gift Card खरेदी करण्यासाठी तुम्ही स्वयंचे वार्षिक वर्गणीदार असायला हवं अशी अट नाही, पण तुम्ही वेबसाईटवर Registered User असणं आवश्यक आहे.

या नवीन वर्षाच्या निमित्ताने तुमच्या प्रियजनांसह काही होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना आपण 'स्वयं डिजिटल'ची ही अमूल्य भेट दिलीत तर त्यांचे आयुष्य निश्चितपणे उजळून निघेल असे वाटते. यासाठी आपल्या सोयीसाठी आम्ही विद्यादान सहाय्यक मंडळ (ठाणे) व दीपस्तंभ (जळगाव) या दोन संस्थांमधील काही निवडक विद्यार्थ्यांची नावे तुम्हाला सुचवू शकतो. हे सर्व विद्यार्थी अत्यंत गुणवान असून खडतर परिस्थितीवर मात करत आपलं शिक्षण पूर्ण करत आहेत. या विद्यार्थ्यांना 'स्वयं डिजिटल' चे Gift Card देण्यासाठी या विद्यार्थ्यांची नावे व ईमेल आयडी हवे असल्यास कृपया माझ्याशी संपर्क साधावा.

नुसते पैसे असले की समाज समृद्ध होत नसतो. केवळ पैशांमुळे येणारी समृद्धी म्हणजे फक्त सूज असते. त्या समृद्धीला जेव्हा 'ज्ञानाचं' कोंदण लाभतं तेव्हा त्या समृद्धीचं तेज अधिक निकोप असतं. समाजाच्या 'बौद्धिक आणि वैचारिक' संपत्तीची वृद्धी कशी साधता येईल, याच विचारातून 'स्वयं'चा जन्म झालाय. आपलं जगणं समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील नवनवीन Ideas आणि Innovations तळागाळात पोहोचावीत व आपल्यातील एखाद्याची Entrepreneurship हे 'वैशिष्ट्य' न वाटता, तो आपल्या मराठी संस्कृतीचा 'सहज स्वभाव' व्हावा हे 'स्वयं'चे स्वप्न आहे. आपल्या सर्वांच्या सहयोगाने हे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास वाटतो.

'आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना' हे आमच्या Gift Card चं ब्रीदवाक्य आहे. 'स्वयं'ने आपल्या आयुष्यात अगदी किंचितसा जरी आनंद पेरला असेल तर तुमच्या प्रियजनांना 'बी-घडवण्यासाठी' स्वयं डिजिटलच्या Gift Card या नव्या पर्यायाचा आपण नक्की विचार करावा.

खरं तर तुम्हाला प्रत्यक्ष भेटून नवीन वर्षाच्या शुभेच्छा घ्यायला आवडलं असतं. पण सध्याच्या काळात तेही शक्य नाही. मला अवचटांइतकं छान लिहिता येत नाही, पण म्हटलं निदान तुमच्याशी गप्पा माराव्यात. स्वयं मध्ये आम्ही काय काय नवं करतोय ते सांगावं. माझं हे 'गिफ्ट' तुम्हाला आवडलं असेल अशी आशा करतो.

तुम्ही सर्वांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्या.. सकारात्मक राहा. आनंदी राहा.
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!

आपला,
नविन काळे

लेखक हे ‘स्वयं’ चे संस्थापक सदस्य आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...

चांगुलपणाची प्रतिमा : मिसेस हॅरिस

कधी उगाच उदास वाटतं, माणुसकी, चांगुलपणा यावरचा विश्वास कमी व्हायला लागतो, उगीच चिडचिड होत असते, राग राग करून काही होणार...

स्वच्छतादूत : पद्मश्री एस. दामोदरन

दक्षिण भारतातील ६०० हून अधिक गावे आणि २०० पेक्षा अधिक झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना उघड्यावर शौच करण्यापासून परावृत्त...