Expecto Petronum - Welcome to Swayam Talks
×

Expecto Petronum

दिपाली पाटील

आपल्या आयुष्यातल्या आठवणींचा प्रभाव किती खोलवर असतो याची जाणीव आपण करुन घ्यायला हवी. ती एक जादूची छडी आहे आणि त्या जादूच्या छडीच्या सामर्थ्यामागचं तंत्र विशद करतेय दिपाली.
 

Published : 15 March, 2021

Expecto Petronum

Harry Potter - Prisoner Of Azkaban या सिनेमात अक्राळ विक्राळ Dementor नावाच्या त्या राक्षसाला पळवून लावण्यासाठी 'Expecto Petronum' (पितृ देवो संरक्षणं) ही जादू Harry ने वापरल्याचे तुम्हाला आठवत असेल. केवळ जादूची छडी समोर करून किंवा फक्त मंत्रोच्चाराने  ही जादू प्रभावी ठरत नाही तर त्याच्या जोडीला आपल्याला आपल्या आयुष्यातील सकारात्मक आणि शक्तिशाली आठवणी जागृत कराव्या लागतात. ह्या आठवणी जितक्या शक्तिशाली असतील तितक्याच सहजतेने त्या राक्षसाला आपण आपल्यापासून लांब पळवून लावता येईल आणि जर त्या राक्षसाला आपल्यातल्या वाईट, त्रासदायक आठवणींचा धागा गवसला तर ते Dementor जीवघेणे पण ठरू शकतात. ही जरी एक कपोलकल्पित आणि रंजक कथा असली तरी प्रत्यक्ष जीवनात ‘आठवणींचं' सामर्थ्य अनुभवायला मिळतंच की आपल्याला!!

आयुष्यातल्या सगळ्यात कठीण वळणावर योग्य प्रसंगावधान राखायला अशा आठवणींची शिदोरी आपल्याकडे असलीच पाहिजे. काही आशीर्वादाचे, काळजी करणारे, शुभेच्छा देणारे स्पर्श, आपल्याच माणसाने खूप दिवसांनी भेटल्यावर मारलेली मिठी, इवल्याश्या हातांनी आपल्या गळ्याभोवती गुंफलेला हात, मी आहे तुझ्यासोबत हे सांगणारी आश्वस्त करणारी नजर, एखाद्याला हर्षोल्हासाने दिलेली अनुमोदनाची   टाळी, Confidently केलेला एखादा hand shake ... या आणि अशा अनेक आठवणी.

या सगळ्या आठवणीतील सुखावलेपण, त्यात गवसणारं समाधान, मानसिक स्थैर्य, आनंद या सगळ्या गोष्टी केवळ शब्दातीत असतात. ह्या सगळ्या आठवणीचा साठा अवघड वाटेवर ‘संरक्षक कवच’ असल्यासारखा काम करतो. आणि मग ‘Expecto Petronum’ ही फक्त एकदाच करून बघायची जादू रहात नाही. यात सातत्य तर हवेच, पण जर का ही सवय झाली तर त्याच्यासारखी दुसरी अनुभूती नाही. पण मग प्रत्येक वेळेला Dementor येण्याची वाट का बघावी? कधी तरी याच आठवणींना पिंजून बघायला काय हरकत आहे? बघा कसं वाटतंय? 

मात्र हे करण्याचा प्रयत्न करताना जर का चुकून तो समोरचा राक्षस प्रभावी ठरला तर भूतकाळातल्या कटू आठवणींची यादी लगेच डोळ्यांसमोर उभी राहते. चारचौघांत झालेला शाब्दिक अपमान असू देत की कोणी काहीही न बोलताच डोळ्यांनी केलेला उपहासात्मक वार असू देत. या कटू आठवणींत पण किती क्षुल्लक गोष्टी पण असू शकतात याचं आश्चर्य वाटतं कधीतरी. एका भल्या माणसाने सांगितले आहे मला "देवाने आपल्याला एक सगळ्यात छान भेट दिली आहे ते म्हणजे विस्मरण" हे विस्मरण जर नसते तर आपले आयुष्य हे रडण्यातच नसते का गेले? ह्या ‘विस्मरण’ नावाच्या जादूचा पण आपण योग्य वापर करू शकलो तर नको असलेल्या, त्या कितीतरी वेदनादायी आठवणी मागेच राहून जातील नाही का? 

आयुष्यात एक पाऊल पुढे जाण्यासाठी कधी कधी काही निरोगी टीका असाव्यात आठवणीत पण त्या पलीकडे त्यांची खरंच काही गरज असते का? 

कधीतरी नकळत एक दिवस असा उजाडतो की आपण त्या एका दिवशी खूप आनंदी असतो ... अगदी सातवे आसमान पे वगैरे. त्या साठी काही विशेष घडलेले असायला हवे असेही काही नाही. 
काहीतर वेगळंच उमगल्याची जाणीव होते जणू. नंतर कधी त्या दिवसाची आठवण आली की गंमत वाटते. काहीच विशेष न घडताही, घडलेला तो दिवस सकारात्मक ऊर्जेचं एक मोठ्ठं भांडार आपल्यासाठी सोडून जातो. 

माझ्या व्यक्तिगत आयुष्यात बऱ्याच वळणांवर 'Expecto Petronum' ही जादू काम करून गेली आहे. ही जादू प्रभावी ठरतेय म्हटल्यावर तर मी माझ्या आठवणींची चक्क पानभर यादीच लिहून काढली होती. 

आणि तुमचं काय? कधी अचानक असा कुठला Dementor जर का समोर आला तर, त्याला सशक्त प्रत्युत्तर द्यायला तुमची पण अशा सगळ्या क्षणांची, स्पर्शांची, नजरांची आणि आठवणींची यादी तयार असेलच .....बरोबर? 

- दिपाली पाटील

लेखिका या स्वयं च्या Operations Team च्या सदस्य आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

देणगी काहीतरी सुचत राहण्याची!

सर्जनशील असणं याची मुभा सगळ्यांना आहे. आपण एखाद्या गोष्टीचा विचार कसा करतो? आणि त्याचा अवलंब कसा करतो? यावर सारं अवलंबून...

आसामच्या 'लक्ष्मी माँ': पद्मश्री लखिमी बरूआ

आसाम सारख्या दुर्गम भागातील राज्यात महिला सक्षमीकरण आणि सहकार क्षेत्रांत आसामी महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्यात...

कल्पनाशक्तीची नवी 'LINE'

कल्पनाशक्ती जादुई असते. ती नवे क्षितिज दाखवते आणि त्या पलीकडे काय असेल ह्या विचारात पाडते. अशाच एका अद्भुत विचाराला...